पर्यटनाला आले, जीव गमावून बसले; गोव्यातील मैनापी धबधब्यात दोघे बुडाले | पुढारी

पर्यटनाला आले, जीव गमावून बसले; गोव्यातील मैनापी धबधब्यात दोघे बुडाले

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे प्रभावीत झालेल्या धबधब्यांवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झालेल्या स्थानिक पर्यटकांच्या गटातील दोघेजण एकमेकांना वाचवताना बुडाल्याची दुर्दैवी घटना नेत्रावळीतील प्रसिद्ध मैनापी धबधब्यावर घडली आहे. म्हापसा येथील जगदीश खेडेकर (52वर्षे) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास वन खात्याच्या सुरक्षा रक्षकाला यश आले आले तर वास्को येथील शिवदत्त नाईक (28वर्षे) याला शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. शिवदत्त याचा मृतदेह खोल डोहात अडकलेला आहे. धबधब्याचा प्रवाह भयंकर असल्याने पाण्यात उतरण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत.

मृतदेह वर नेण्यासाठी तब्बल सहाशे पायर्‍या आणि तीन तास

मैनापी धबधब्यावरून जगदीश यांचा मृतदेह वर आणणार्‍या पथकाला तब्बल सहाशे पायर्‍या चढाव्या लागल्या. पाऊस आणि जोरदार वारा अशा वातावरणात तो मृतदेह वर आणताना पोलिस, वन खाते आणि 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांच्या नाकीनऊ आले. कधी स्ट्रेचर डोकीवर तर कधी खांद्यावर घेऊन पायर्‍या चढाव्या लागल्या. ग्रामस्थांनीही त्यांना या कामी मदत केली.

हेही वाचलंत का?

Back to top button