भाजीपाला बाजारात टोमॅटोचे भाव शंभरीचा पार; इतर भाजीपाल्‍याचे दर गगणाला भिडले | पुढारी

भाजीपाला बाजारात टोमॅटोचे भाव शंभरीचा पार; इतर भाजीपाल्‍याचे दर गगणाला भिडले

जवळाबाजार, पुढारी वृत्‍तसेवा : सध्या पावसाळ्याचे मृग नक्षत्र कोरडे गेले तर आर्द्रा पावसाचे नक्षत्र लागून जवळपास पाच दिवस होऊन सुध्दा पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरणी लांबला आहेत. तर शेतकरी जनावराचा चाराचा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पावसास विलंब आणि उन्हाळा पेक्षा तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ झाले आहे.

महावितरण विजेचा प्रश्न सुध्दा निर्माण झाला मुळे परिसरात बागायतदार क्षेत्र मोठ्याप्रमाणात असून सुध्दा पाणी आहे तर विज नाही. पावसाचे सुध्दा आगमन होत नसल्याने शेतकऱी हातबल झाले आहेत. तर सध्या सर्वसामान्य नागरिक मोठ्याप्रमाणात हाल निर्माण झाले. कारण दाळीचा भावात मोठ्याप्रमाणात वाढ आणि सध्याच परिस्थितीत भाजी पाला उत्पन्न कमी प्रमाणात होत असल्याने परिसरातील ४० ते ५० गावातील नागरिकास येथील आठवडी बाजारावर अवलंबून असल्याने येथील रविवार फार मोठा भाजीपालाचा बाजार भरतो परभणी, गंगाखेड, वसमत, हिंगोली, जिंतूर आदी ठिकाणाहून भाजीपाला येतो.

पण उत्पन्न कमी असल्याने भाजीपाल्‍याचा भावात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. टोमॅटो १०० रूपये किलो तर भेंडी चवळी पानगोबी , फुलगोबी, व पालाभाजाचे ८०रूपये किलो भाव झाल्‍याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहे.

-हेही वाचा 

पोवाचीवाडीच्या पोलिस पाटलाचा निर्घृण खून

आषाढामुळे चिकन, अंड्याच्या भावात वाढ

पिंपरी : पाणीटंचाईमुळे टँकर लॉबीचे फावतेय; सोसायटीधारकांना लाखोंचा भुर्दंड

Back to top button