अहमदनगर : बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा | पुढारी

अहमदनगर : बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : तोफखाना पोलिसांनी मंगलगेट चौकीजवळ सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापा टाकून एकाला ताब्यात घेऊन कारवाई केली. या कारवाईत 30 हजार 262 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पोलिस हवालदार गौतम सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रथमेश शिरिष थोरात (वय 19, रा.वंजारगल्ली, रामचंद्र खुंट, ता.जि.अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (दि.20) दुपारच्या सुमारास मंगलगेट चौकीजवळ एका टपरीच्या आडोशाला बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलिस हवालदार संदीप धामणे, दत्तात्रय कोतकर, शिरिष तरटे, सतीश भवर या पथकाने छापा टाकला.

 

Back to top button