Russia-Ukraine updates : युक्रेनमध्ये धरण कोसळून १६ जणांचा मृत्यू, ३१ बेपत्ता  | पुढारी

Russia-Ukraine updates : युक्रेनमध्ये धरण कोसळून १६ जणांचा मृत्यू, ३१ बेपत्ता 

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमधील नोव्हा काखोव्का धरण कोसळून निर्माण झालेल्या पुरात किमान १६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३१ लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने शनिवारी (दि.१७) दिली आहे. याबाबत सीएनएनने वृत्त दिले आहे. (Russia-Ukraine updates) वाचा सविस्तर बातमी.

रशियाने हल्ला केला, युक्रेनचा आरोप

माहितीनुसार, दक्षिण युक्रेनमधील धरण ६ जून रोजी कोसळले, गावे उद्ध्वस्त झाली, शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. पूर आला आणि हजारो लोकांचा वीज आणि शुद्ध पाणी पुरवठा खंडित झाला. कीवच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या नियोजित प्रतिआक्रमणापूर्वी रशियाने घाबरून धरण उडवले, तर रशियाने क्रिमियाला पाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी आणि युद्धभूमीपासून विचलित करण्यासाठी युक्रेनच्या संरचनेवर हल्ले सुरू केल्याचा आरोप केला आहे. युक्रेनच्या अंतर्गत मंत्रालयाने शनिवारी (दि.१७) सांगितले की, पूरग्रस्त भागातून ३,६१४ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे “यात ४७४ मुले आणि ८० लोकांची हालचाल कमी झाली आहे.” तर खेरसन आणि मायकोलायव्ह प्रदेशात १,३०० घरे पुराखाली गेली आहेत.

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून धरणाच्या आजूबाजूचा भाग हा सर्वात जास्त वादग्रस्त प्रदेशांपैकी एक आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, डनिप्रो नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले खेरसन शहर नोव्हेंबरमध्ये युक्रेनियन सैन्याने आठ महिन्यांच्या रशियन ताब्यानंतर मुक्त केले. परंतु नोव्हा काखोव्का धरणाच्या दक्षिणेकडील नदीच्या पूर्व किनाऱ्याचा बराचसा भाग रशियाच्या ताब्यात आहे.

Russia-Ukraine updates : दुरगामी परिणाम 

काखोव्का धरण आणि जलविद्युत केंद्र हे १९५६ मध्‍ये बांधण्‍यात आले. युक्रेनमधील सर्वात मोठ्या ऊर्जा सुविधांपैकी एक, अशी त्‍याची ओळख होती. आता रशियाने त्‍याच्‍यावर हल्‍ला केल्‍याने त्‍याचे दूरगामी परिणाम होतील. शेकडो बळी पडतील, अशी भीतीही नय्‍यम यांनी व्‍यक्‍त केली होती.

हेही वाचा

Back to top button