Twitter New Feature : मस्क यांची मोठी घोषणा! लवकरच येणार स्मार्ट टिव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अ‍ॅप | पुढारी

Twitter New Feature : मस्क यांची मोठी घोषणा! लवकरच येणार स्मार्ट टिव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अ‍ॅप

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर आता लवकरच ट्विटर व्हिडिओ अ‍ॅप येणार आहे. याबाबत ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी स्वत: माहिती दिली आहे. हे फिचर ट्विटर युजर्ससाठी ट्विटरचा वापर करण्यास सुलभ ठरेल. हे अ‍ॅप स्मार्ट टिव्ही संबधित आहे. जाणून घ्या ट्विटरचे नवे फिचर काय आहे. (Twitter New Feature)

Twitter New Feature : काय आहे ट्विटरचे नवे फिचर

ट्विटरची (Twitter) मालकी हक्क मिळाल्यापासून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क नवनवीन फिचर्स आणतं आहेत. (Elon Musk) मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटरवर अनेक प्रयोग करत असतात. अशातच आता एलॉन मस्क यांनी एका ट्विटर युजरच्या ट्विटला प्रतिसाद देताना दुजोरा दिला आहे की, लवकरच स्मार्ट टिव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अ‍ॅप येणार आहे. त्या S-M Robinson (@sunoxen) या ट्विटर युजरने ट्विट करत विचारलं होत की, “आम्हाला खरोखरच स्मार्ट टीव्हीसाठी ट्विटर व्हिडिओ अ‍ॅपची आवश्यकता आहे. मी ट्विटरवर एक तासाचा व्हिडिओ पाहत नाही. ज्याला मस्कने उत्तर दिले, ते येत आहे. त्याच्यानंतर S-M Robinson (@sunoxen) याने रिप्लाय दिला आहे की, “कौतुक,  मी एक दिवस  YouTube चे सदस्यत्व रद्द करू शकेन. 

कंपनी विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क ट्विटरमध्ये अनेक बदल करत आहे. त्यापैकी एक म्हणजे सोशल मीडिया व्हिडिओ आहे. याआधी ट्विटरने आपल्या व्हेरिफाईड यूजर्सना 2 तासांचा व्हिडिओ अपलोड (8GB) अपलोड करू शकतात.

हेही वाचा 

Back to top button