Mamata Banerjee : बंगालमध्ये सीपीएमशी युतीत राहिल्यास काँग्रेसला सहकार्य नाही – ममता बॅनर्जी

Mamata Banerjee : बंगालमध्ये सीपीएमशी युतीत राहिल्यास काँग्रेसला सहकार्य नाही – ममता बॅनर्जी
Published on
Updated on

काकद्विप; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस जोवर सीपीएमसमवेत युतीत आहे, तोवर त्यांनी लोकसभेसाठी सहकार्याची अपेक्षा ठेवू नये, असे स्पष्ट प्रतिपादन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले. दि. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी दलांची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यापूर्वीच ममता यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघेल, हे निश्चित आहे.

काकद्विप येथील एका सार्वजनिक सभेला उद्देशून बोलत असताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, 'अनेक राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला बंगालमध्ये सीपीएमचे सहकार्य लाभते. ते भाजपचे मित्रपक्ष आहेत आणि संसदेत त्यांना आमचे सहकार्य हवे असते. भाजपला विरोध असल्याने आम्ही ते ही करतो. पण, एक लक्षात ठेवावे की, बंगालमध्ये तुम्ही सीपीएमसमवेत राहणार असाल तर लोकसभेत सहकार्यासाठी आमच्याकडे येऊ नका'.

ममता बॅनर्जी, वरिष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी आठवडाभरातच बैठक घेत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपविरोधी एकत्रित मोट बांधण्यावर यावेळी विचारविमर्ष होणार आहे. मात्र, 'बंगालमध्ये काँग्रेस-सीपीएम एकत्रित असतील तर फेरविचार करावा लागेल', असे ममतांनी यावेळी ठणकावून सांगितले. बंगालमधील पंचायत निवडणुकीत काँग्रेस व सीपीएम हे पक्ष तृणमूल व भाजपविरुद्ध लढत आहेत. सीपीएमने 48646 उमेदवार तर काँग्रेसने आणखी 17750 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. सीपीएम-काँग्रेस यांनी भाजपपेक्षा अधिक उमेदवार उतरवण्याचा यावेळी विक्रम केला आहे. भाजपचे 56321 उमेदवार रिंगणात आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news