Mann Ki Baat : PM मोदी ‘मन की बात’मधून आज संवाद साधणार; यावेळी एक आठवडापूर्वी प्रसारण, जाणून घ्या कारण | पुढारी

Mann Ki Baat : PM मोदी 'मन की बात'मधून आज संवाद साधणार; यावेळी एक आठवडापूर्वी प्रसारण, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. मात्र, या महिन्यात मन की बात हा कार्यक्रम आठवडाभरापूर्वी प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम आज (दि.18) सकाळी 11.00 वाजता प्रसारित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी महिन्याच्या शेवटच्या रविवारी (दि.25) अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे मन की बात कार्यक्रमाचे एक आठवडाआधी प्रसारण केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः 13 जून रोजी ट्विट करून याची माहिती दिली होती. तसेच त्यांनी कार्यक्रमासाठी देशाच्या नागरिकांना त्यांचे विचार, संकल्पना सुचवण्यासाठी आवाहन केले होते. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमासाठी काही सुचवायचे असेल तर तुम्ही NaMo अॅप किंवा-MyGov.in वर आपले मत व्यक्त करू शकता किंवा 1800-11-7800 या क्रमांकावर कॉल करून आपला संदेश पाठवा. (Mann Ki Baat)

मन की बातमध्ये यावेळी रामपूरच्या महिलांना मिळणार विशेष सम्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाचा हा 102 वा भाग आहे. या भागात ते उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील मुसलमान महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी संवाद साधतील, अशी माहिती रामपूरचे आमदार आकाश सक्सेना यांनी दिली. हा कार्यक्रम रंगोली मंडप येथे आयोजित केला आहे. Mann Ki Baat

हे ही वाचा :

Mann Ki Baat : ‘मन की बात’साठी देशवासियांनी आत्मियता आणि आपुलकी दाखवली- पीएम मोदी

‘Mann ki Baat@100’ : ‘मन की बात पाहता पाहता हे जनआंदोलन बनले’, वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले,

Back to top button