कर्जतमध्ये कमेंटयुद्ध : बाजार समिती मतफुटी सोशल मीडियात | पुढारी

कर्जतमध्ये कमेंटयुद्ध : बाजार समिती मतफुटी सोशल मीडियात

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीत संचालक फुटीच्या बातमीवर सोशल मीडियात केलेल्या कमेंटवरून वाद होऊन कर्जत पोलिस ठाण्यात मारहाणीच्या परस्परविरोधी तीन फिर्यादी व त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या मुलाला मारहाणीची व शिविगाळीची फिर्याद पोटरे यांनी दिली. तिचा आशय असा ः बाजार समितीतील फुटीबाबत आपण केलेल्या कमेंटवर सोमनाथ यादव यांनी टीका करणारी व मी पुन्हा उत्तर देणार्‍या कमेंट केल्या. त्यावरून गुरुवारी रात्री निवासस्थानी येऊन सोमनाथ यादव व सुधीर यादव व इतर पाच जणांनी मुलगा कृष्णा यास मारहाण केली, तसेच पत्नीचा हात धरला. त्यात गंठण गहाळ झाले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या विरोधात बहिरोबावाडी येथील सोमनाथ यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 15 जून रोजी पोस्टबाबत सचिन पोटरे यांना फोन केला असता त्यांनी अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. मला घरी ये असे म्हणाला. त्यांच्या घराबाहेर जाऊन थांबलो तेव्हा त्याची पत्नी व मुलाने शिविगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

सुधीर रामदास यादव यांनीही पोटरे यांच्याकडून शिवीगाळ झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पंधरा तारखेला सुधीर यादव हे पोलीस स्टेशन समोरून जात असताना सचिन पोटरे, कृष्णा पोटरे, सुवर्णा पोटरे व धनंजय आगम या सर्वांनी शिवीगाळ करून धमकी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कर्जत पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. थोटे गुन्हे मागे घेण्याचे निवेदन देण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, सचिन मांडगे, दीपक यादव, नवनाथ कानगुडे, विलास धांडे, आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा

गोवा : पर्यटकाला लुबाडणार्‍या 12 दलालांना अटक

पुणतांबा : गणेश कारखान्यामध्ये परिवर्तन घडवा : आ. थोरात

Back to top button