शेवगाव : सिंचन योजना टप्पा दोनचे काम तातडीने पूर्ण करा : आमदार राजळे | पुढारी

शेवगाव : सिंचन योजना टप्पा दोनचे काम तातडीने पूर्ण करा : आमदार राजळे

शेवगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा दोनचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या आहेत. आधिकार्‍यांच्या समवेत त्यांनी या योजनेची पाहणी केली. ताजनापूर योजना टप्पा दोनच्या खानापूर येथील मुख्य पंपगृह, कळयंत्र आवार, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग, यांत्रिकी काम, तसेच पाईप वितरण व्यवस्था, वितरण कुंड आदींची पाहणी आमदार राजळे यांनी बुधवारी (दि.14) केली.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, मध्यम प्रकल्प नगर कार्यकारी अभियंता के. एल. मासाळ, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता अजिंक्य थोरात, ताजनापूर प्रकल्प उपविभागीय अधिकारी एस. यु. कुलकर्णी, विद्युत उपविभागीय अधिकारी एस. बी. माळी, संबंधित ठेकेदार, लक्ष्मणराव टाकळकर, सुरेश नेमाने, जगन्नाथ भागवत, राजाराम तेलोरे, भगवान तेलोरे, तुकाराम थोरवे, राजेंद्र घुगे, पीरमोहम्मद शेख, सोमनाथ मडके, नारायण मडके, आसाराम मडके, अर्जुन ढाकणे, ज्ञानेश्वर कुलट, पंडित भागवत, मधुकर गोरे आदी उपस्थित होते.

ताजनापूर उपसा सिंचन योजना पायलेट प्रोजेक्ट असून, टप्पा दोनचे मुख्यपंपगृह, विद्युत कामे पूर्ण झाली आहे. चापडगाव, नजीक बाभूळगाव, सोनेसांगवी, गदेवाडी येथील दोन वितरण कुंडाची कामे पूर्ण झाले आहे. मागील काळात प्रोजेक्टचे डिझाईन, तसेच भूसंपादनासाठी बराच कालावधी गेला.

2014पासून योजनेसाठी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध केला. मागील आर्थिक वर्षात योजनेसाठी 18 कोटींची तरतूद करण्यात आली. ती कामे आता पूर्ण झाली. यावर्षी 36 कोटींची तरतूद असून, ही कामे चालू आहेत. मार्चपर्यंत शेतकर्‍यांना प्रत्यक्षात लाभ देण्यास सुरुवात होईल, आगामी काही दिवसांत टप्पा दोन योजना पूर्णत्वास नेण्याचा आपला मानस असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील खानापूर, अंतरवाली, नजीक बाभूळगाव, राक्षी, कुरुडगाव, रावतळे, मळेगाव, गदेवाडी, ठाकूर निमगाव, सोनेसांगवी, कोळगाव, हसनापूर, वरखेड, चापडगाव, दहिगाव-शे, प्रभूवाडगाव, मंगळूर खुर्द, मंगरूळ बुद्रूक, आंतरवाली बुद्रूक या गावांसाठी वरदान ठरणारी ताजनापूर सिंचन योजना टप्पा दोनच्या उर्वरित कामासाठी आवश्यक त्या निधीची मागणी करू, परंतु बहुप्रतिक्षित योजनेचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे सूचना आमदार राजळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

हेही वाचा

विशाळगडावर पशुबळी प्रथा बंदीला आव्हान; याचिकेवर आज सुनावणी

पुणे : नळ योजनांची 155 कामे लटकली ; ‘जलजीवन’मध्ये ठेकेदारांना नोटिसा

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाचीबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण

Back to top button