विशाळगडावर पशुबळी प्रथा बंदीला आव्हान; याचिकेवर आज सुनावणी | पुढारी

विशाळगडावर पशुबळी प्रथा बंदीला आव्हान; याचिकेवर आज सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या संरक्षित क्षेत्रात पशुबळीच्या जुन्या प्रथेला घालण्यात आलेल्या बंदीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

विशाळगडच्या हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्गा ट्रस्टच्या वतीने अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी (दि. 15) सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय उपसंचालकांनी विशाळगडावर पशुबळी प्रथा बंद करण्याचा आदेश नुकताच दिला आहे.

Back to top button