बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचविण्यासाठी गेलेली मुलगी बुडाली | पुढारी

बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचविण्यासाठी गेलेली मुलगी बुडाली

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचवायला गेलेली ११ वर्षीय मुलगी बुडाली. ही घटना देवालय पर्यटन स्थळावर बुधवारी (दि.१५) घडली. फिवोना सलोमन जमूला (वय ११, आंबेडकर गल्ली, सुळगा बेळगाव) असे या मुलीचे नाव असून तिचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सलोमन जमूला हे आपल्या दोन्ही मुलींना घेऊन हाजगोळी चाळोबा देवालय जवळील बॅक वॉटर परिसरात फिरायला गेले होते. त्यानंतर ते बॅक वॉटरमध्ये अंघोळीसाठी उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यादरम्यान बुडणाऱ्या बापाला वाचवण्यासाठी फिवोनाने पाण्यात उडी मारली व तीही बुडाली. वडील सलोमन जमूला यांना वाचविण्यात पर्यटकांना यश आले असून फिवोना हिचा शोध सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button