१६ हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांचा हृदयविकाराने निधन | पुढारी

१६ हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्‍टरांचा हृदयविकाराने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हृदय शस्त्रक्रियेमध्‍ये पारागंत अशी ओळख असणार्‍या गुजरातमधील जामनगर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ( Gujarat cardiologist ) ते ४१वर्षांचे होते. डॉ गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत १६ हजारां हून अधिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या होत्‍या. त्‍यांचाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने वैद्यकीय वर्तुळात धक्का बसला आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव गांधी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूने शहरातील वैद्‍यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, डॉ. गौरव नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री काही रुग्णांची तापासणीकरुन पॅलेस रोडवरील त्यांच्या निवासस्थानी परतले. त्‍यांनी रात्रीचे जेवण घेतले. रात्री त्‍यांना कोणताही शारीरिक त्रास झाला नाही. त्यांची प्रकृतीही चांगली होती.

शुक्रवारी सकाळी डॉ. गौरव नेहमीपेक्षा अधिक काळ झोपूनच होते. कुटुंबातील सदस्‍यांनी त्‍यांना जागे करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. कुटुंबीयांनी त्‍यांना तात्काळ रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला असल्‍याची घोषणा डॉक्‍टरांनी केली. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button