नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असते. या मोसमात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. या मोसमात काही भाज्यांचे सेवन करणे खूप गरजेचे असते आणि या भाज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषकतत्त्वे असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. उन्हाळ्यात काही भाज्या आहारात सामील करणे फायद्याचं ठरू शकतं, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळं डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी लोक त्यांच्या डाएटमध्ये विविध प्रकाराचे फूड आयटम सामील करू शकतात. जे पाण्याची कमतरता भरून काढू शकतात. काकडीमध्ये पाणी भरपूर असते जे डिहायड्रेशनची समस्या दूर करू शकतात. शेवग्याच्या शेंगा व या झाड्याच्या प्रत्येक भाग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अँटिबायोटिक आणि अँटिबॅक्टेरीयल गुण असतात. जे तुम्हाला कित्येक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करतात. ही भाजी फायबरने परिपूर्ण असते.
उन्हाळ्याच्या दिवसांत थकवा व अशक्तपणाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगा बरोबर शेवग्याच्या पानांचे सेवनही करू शकता. कारले जरी कडू असते, तरी ते आरोग्यासाठी अमृतापेक्षा काही कमी नाहीये. कारल्यात भरपूर व्हिटॅमीन, आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅगनीजसारखे तत्त्व आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही भाजी खूप उपयुक्त आहे. दोडका उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर उपलब्ध असतो. दुधी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधीमध्ये अनेक पोषक तत्त्वे आढळले जातात जे शरीराला मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. तसंच, उन्हाळ्याच्या दिवसांत डिहायड्रेशनपासूनही बचावतो.