चंद्रपूर : ‘सरबत घ्या, पण वाहने सावकाश चालवा’; भद्रावती पोलिसांची गांधीगिरी | पुढारी

चंद्रपूर : ‘सरबत घ्या, पण वाहने सावकाश चालवा’; भद्रावती पोलिसांची गांधीगिरी

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नियमांचे पालन होऊन अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभाग नेहमीच कार्यतत्पर असतो, परंतु वाहन चालक नियमांना पायदळी तुडवीत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नागरिकांनी नियमाचे पालन करावे आणि अपघात रोखले जावे या करिता शनिवारी (२७ मे) भर उन्हात भद्रावती पोलिसांची अनोखी गांधीगिरी पाहायला मिळाली. भद्रावती चंद्रपूर मार्गावरील कोंढा फाट्यावर मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना थांबवून सरबत पाजण्यात आले आणि वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले. भद्रावती पोलिसांच्या गांधीगिरीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र खैरकर यांचे नेतृत्वात वाहतूक नियमाचे पालन होऊन अपघाताचे प्रमाण टाळता यावे या करीता भद्रावती ते चंद्रपूर मार्गांवरील कोंढा फाटा येथे प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी पोलि उपनिरीक्षक उमाकांत गौरकार, सहीद शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय गेडाम, हेड कॉन्स्टेबल काशीनाथ निगोट, चंयालाल राजपुत, नाईक पोलिस शिपाई प्रमोद पिसे, नलप्रविन बोंढे  यांची उपस्थिती होती. यावेळी ट्रक, बस, टेम्पो, टु व्हिलर, कार व सर्व प्रकारचे वाहणे चालक व प्रवासी यांना उन्हाळ्याच्या दिवसात थांबुन थंड सरबत, पाणी पाजुन तृष्णा तृप्ती करण्यात आली. त्यानंतरच वाहन चालकांना अवजड वाहन नेहमी दुसऱ्या लेनमध्ये चालवावे, गणवेश नीटनेटका असावा, पूर्ण वेळ झोप घेऊनच वाहन चालवावे, वाहनांची स्थिती काय आहे, ही खात्री करूनच वाहन चालवावे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळावा, गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.

वाहतुकीचे नियम न पाळल्यास अपघात झाल्यावर कुंटुबांचे आर्थिक, मानसीक, शारीरिक नुकसान होवुन वेळ वाया जातो, असे सांगत प्रबोधनासाठी पोलिसांकडून गांधीगिरीचा मार्ग अवलंबविण्यात आला. वाहतुकीचे नियमाबाबत प्रवाशांना अवगत करण्यात आले. भर उन्हात ५० ते ६० वाहने थांबवुन २०० ते २५० चालक व प्रवाशाना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.

अधिक वाचा :

Back to top button