चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक | पुढारी

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर आणि भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज (दि.२७) सायंकाळी ५.३० वाजता नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

नारायण धानोरकर यांच्यावर नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. भद्रावती येथील डिफेन्स जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते.  त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी अनिता बोबडे, सून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा 

 

Back to top button