अमरावतीत बच्चू कडू -रवी राणा वाद पेटणार प्रहारने ठोकला लोकसभेच्या जागेवर दावा | पुढारी

अमरावतीत बच्चू कडू -रवी राणा वाद पेटणार प्रहारने ठोकला लोकसभेच्या जागेवर दावा

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा भेटणार असल्याची चिन्हे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. प्रहारने लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला असून आमदार राणा यांनी देखील कितीही दावे केले ते खोटे ठरतील असे प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीची लोकसभेची जागा प्रहार लढविणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. बच्चू कडू यांनी यापूर्वी लोकसभेची जागा लढवली असून त्यांचा केवळ ५००० मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आगामी लोकसभेची जागा प्रहार लढविणार असून त्यांच्याकडे सक्षम उमेदवार देखील असल्याचे कडू म्हणाले. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि प्रहार सोबत असून लोकसभेची जागा प्रहारणे मागणे गैर नसल्याचे कडू म्हणाले. आमदार राणा यांचा आशावाद बरोबर असल्याचे सांगत विधानसभेत देखील १५ जागेची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले.
बच्चू कडू यांच्या राजकीय विधान आला प्रत्युत्तर देत एकत्रित प्रचार करणार असल्याचे आमदार राणा यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष युवा स्वाभिमान आणि शिवसेना शिंदे गट सोबत आहे. कोणी कितीही दावे केले तरी आपण एकत्रित प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले. सोबतच माझी खासदार देखील प्रचाराला येणार असल्याचे आमदार राणा यांनी आवर्जून सांगितले. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग महामंडळ तयार केल्याने सरकार तसेच बच्चू कडू यांचे देखील राणांनी अभिनंदन केले.

हेही वाचंलत का?

 

Back to top button