Terrorist Tahavur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाची परवानगी | पुढारी

Terrorist Tahavur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आणि पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन बिझनेसमन तहव्वुर राणाला भारताकडे पत्यार्पण करण्याची परवानगी अमेरिकेच्या न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Terrorist Tahavur Rana)

भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. मुंबईतील हॉटेल ताज आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हा हल्ला घडवून आणला होता. यातील प्रमुख आरोपी कसाब याला फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यातील आणखी एक आरोपी अमेरिकेत असून त्यांच्यावर अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात त्याचे भारतातकडे प्रर्त्यापण करण्यासंदर्भातील सुनावणी सुरु होती. भारताची मागणी मान्य करत कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाने दहशतवादी तहव्वुर राणा याला प्रर्त्यापण करण्याची परवानगी दिली आहे. (Terrorist Tahavur Rana)

कोण आहे तहव्वुर राणा

तहव्वूर राणा याचा जन्म पाकिस्तानात झाला. त्याने आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि 10 वर्षे पाकिस्तान आर्मीमध्ये संलग्न डॉक्टर म्हणून काम केले. पण तहव्वूर राणाला त्याचे काम आवडले नाही आणि त्याने नोकरी सोडली. भारताविरोधातील कारवायांमध्ये सहभागी असलेला तहव्वू राणा आता कॅनडाचा नागरिक आहे. पण अगदी अलीकडे तो शिकागोचा रहिवासी होता, जिथे त्याचा व्यवसाय आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, तो कॅनडा, पाकिस्तान, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये गेला आहे आणि तेथे असताना तो सुमारे 7 भाषा बोलू शकतो.


अधिक वाचा :

Back to top button