Asia Cup 2023 : …तर आशिया चषकावर भारत टाकणार बहिष्कार

Asia Cup 2023 : …तर आशिया चषकावर भारत टाकणार बहिष्कार
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र, स्पर्धेच्या आयोजनाबाबत सुरू असलेला वाद चिघळत चालला आहे. कारण, भारताने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तरीही पाकिस्तानला ही स्पर्धा स्वतःच्या देशातच आयोजित करायची आहे. पाकने असाच आडमुठेपणा दाखवला तर भारत या स्पर्धेवर बहिष्कारही टाकू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Asia Cup 2023)

एसीसीने आशिया चषक आयोजनासाठी श्रीलंका, बांगला देश आणि यूएईला पर्याय म्हणून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट्टने ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवावी आणि त्याला युरो-आशिया चषक असे नाव देण्याची अजब सूचना केली आहे. (Asia Cup 2023)

भारतीय क्रिकेट मंडळाच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानने या आशियाई स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल सादर केले असून त्यानुसार पाकिस्तान आणि इतर संघांचे सामने पाकिस्तानात खेळले जातील आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. हा प्रस्तावदेखील भारताने फेटाळून लावला आहे.

यामध्ये इंग्लंडचा समावेश करून युरो-आशिया चषक बनवू शकता, पीसीबीला त्याने सांगितले की, तुम्ही हा पर्याय आशियाई क्रिकेट कौन्सिलपुढे ठेवावा. पूर्वी ऑस्ट्रेलिया-आशिया चषक व्हायचा त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी होत असे. यामध्ये तुम्ही आयर्लंड आणि नेदरलँडस्चाही समावेश करू शकता. ही स्पर्धा विश्वचषकासारखी असेल, कारण यात आशियातील सहा आणि युरोपमधील चार संघ सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा दहा संघांची असेल. ही विश्वचषकाची तालीम होऊ शकते.

पाकिस्तानी मीडियानुसार पीसीबीला हायब्रीड मॉडेलवर आशिया चषक 2023 आयोजित करण्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंकेचा पाठिंबा मिळाला आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशियाई क्रिकेट परिषदेकडे (एसीसी) याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. आता एसीसीचे अध्यक्ष जय शहा येत्या दोन दिवसांत या प्रस्तावाचे मूल्यांकन करतील. मात्र, बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा दुसर्‍या ठिकाणी हलविण्यावर ठाम असल्याने भारत या स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतो.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news