आर्यन खानचे समीर वानखेडेंना चॅलेंज ! मी जेलमधून बाहेर पडल्यानंतर…. | पुढारी

आर्यन खानचे समीर वानखेडेंना चॅलेंज ! मी जेलमधून बाहेर पडल्यानंतर....

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मी एक दिवस चांगला नागरिक बनून चांगले काम करून दाखवेन. गरिबांना मदत करेन, तुम्हालाही माझा अभिमान वाटेल, असा शब्द क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

अटकेत असलेल्या आर्यनचे एनसीबीचे अधिकारी आणि एका एनजीओच्या कर्मचार्‍यांनी कौन्सिलिंग केले होते. त्यात आर्यनने वानखेडे यांना वर्तन सुधारण्यासंबंधी आश्वस्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कोणतेही चुकीचे काम आपल्या हातून घडणार नाही. गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा आपला प्रयत्न राहील, असा शब्द आर्यनने वानखेडे यांना दिला आहे.

दरम्यान, आर्यन सध्या ऑर्थर रोड तुरुंगात असून मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय गुरुवारी झालेल्या सुनावणीत राखून ठेवला होता. या प्रकरणी आता 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

आर्यन खानचा मुक्‍काम २० ऑक्‍टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणातील संशयित आराेपी,  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan Khan drug case ) याच्‍या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्‍यायालयात सुनावणी झाली. न्‍यायालयाने २० ऑक्‍टोबरपर्यंत यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. त्‍यामुळे आर्यन खानचा मुक्‍काम २० ऑक्‍टोबरपर्यंत आर्थर रोड कारागृहातच राहणार आहे.

मागील सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी दोन दिवसांचा कालावधी देण्‍यात यावा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्‍य करत बुधवार जामीन अर्जावरील सुनावणी होईल, असे स्‍पष्‍ट केले होते. मात्र बुधवारी दोन्‍ही बाजूंनी युक्‍तीवाद झाल्‍यानंतर न्‍यायालयाने यावर गुरुवारी निर्णय घेणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते. गुरुवारीही दाेन्‍ही बाजूंनी जाेरदार युक्‍तीवाद झाला. अखेर न्‍यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय  २० ऑक्‍टोबरपर्यंत राखीव ठेवला.

Back to top button