Bhopal : आता भोपाळमध्ये भरधाव कार भाविकांच्या अंगावर घालून अनेकांना चिरडले | पुढारी

Bhopal : आता भोपाळमध्ये भरधाव कार भाविकांच्या अंगावर घालून अनेकांना चिरडले

भोपाळ; पुढारी ऑनलाईन

जशपूर, छत्तीसगडमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान एका भरधाव कारने भाविकांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये (Bhopal) अशीच एक घटना घडली आहे.

शनिवारी रात्री दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान, तीन तरुण एका भरधाव कारच्या चिरडले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण भोपाळच्या (Bhopal) बाजारिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

व्हिडिओमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी मिरवणुकीत लोक नाचत आहेत आणि गातात हे स्पष्टपणे दिसत आहे. मग वेगाने जाणारी कार रिव्हर्स गिअरमध्ये लोकांना चिरडून पुढे जात आहे. या अपघातात तीन तरुणांना कारने धडक दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नाकारले आहे. आरोपी विकृती चालकाला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की जेव्हा कारने लोकांना चिरडले, तेव्हा मिरवणुकीत सहभागी असलेले काही तरुण कारच्या मागे पळाले पण कार चालक कार वळवल्यानंतर पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले. मुलाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. भोपाळचे अतिरिक्त एसपी अंकित जयस्वाल यांनी सांगितले की त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते म्हणाले की कारचा नंबर शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button