परभणी: कौसडी ग्रामपंचायतीत नियुक्त केलेली पदे रद्द करण्याची मागणी | पुढारी

परभणी: कौसडी ग्रामपंचायतीत नियुक्त केलेली पदे रद्द करण्याची मागणी

कौसडी: पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायतीने कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता आणि कोणताही ठराव न घेता लिपिक व पाणी पुरवठा अशी दोन पदाची नियुक्ती केली आहे. दोन्ही पदांची केलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी सय्यद मुजाहेद रहेमत कादरी यांनी जिंतूर गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कौसडी ग्रामपंचायत कार्यालयातील पाणीपुरवठा व लिपिक ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी शासनाने स्थानिक ग्रामपंचायतीला अधिकार दिले आहेत. परंतु या पदांची नियुक्ती करण्यासाठी जाहीर प्रगटन लावणे आवश्यक आहे. तसेच ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन हे पद भरणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतीने कोणतेही ठराव न घेता जाहीर प्रगटन न लावता या पदांवर नियुक्ती केली आहे. ती रद्द करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत माझ्याकडे तक्रार आली आहे. या तक्रारीच्या आधारे आम्ही समिती नेमून चौकशी करू. जर चुकीच्या पद्धतीने या दोन पदावर नियुक्ती झाली असेल. तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

– भाऊसाहेब खरात, गटविकास अधिकारी (पं.स. जिंतूर)

हेही वाचा 

Back to top button