Stock Market Closing | अस्थिरतेत बाजाराची चाल सपाट, सेन्सेक्स ५९,६३२ वर बंद, ‘या’ स्टॉक्समध्ये राहिली तेजी | पुढारी

Stock Market Closing | अस्थिरतेत बाजाराची चाल सपाट, सेन्सेक्स ५९,६३२ वर बंद, 'या' स्टॉक्समध्ये राहिली तेजी

Stock Market Closing : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्सच्या घसरणीमुळे गेल्या तीन सत्रांत शेअर बाजाराचे नुकसान झाले होते. पण गुरुवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५९,७६९ वर तर निफ्टी १७,६०० वर होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले. सेन्सेक्स ६४ अंकांच्या वाढीसह ५९,६३२ वर बंद झाला. तर निफ्टी १७,६२४ वर स्थिरावला. फार्मा स्टॉक्समुळे आज बाजारावर दबाव राहिला. फार्मा स्टॉक्स आज ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बँकिंग, ऑटो आणि IT स्टॉक्समध्ये तेजी राहिली.

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, विप्रो, मारुती आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स वाढले होते. एचडीएफसी बँकेचा शेअर आजच्या ट्रेडिंग सत्रात ४.५० टक्क्यांनी वाढला. तर टाटा स्टील, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, नेस्ले, सन फार्मा, रिलायन्स हे घसरले होते. अदानी पॉवरचा शेअर ५ टक्क्यांनी वाढला.

टाटा मोटर्सचे शेअर्स आठ महिन्यांच्या उच्चांकावर

टाटा मोटर्सचा शेअर आज आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. टाटा मोटर्सची ब्रिटनमधील उपकंपनी जग्वार लँड रोव्हर (JLR) ने पुढील पाच वर्षांत १५ अब्ज पौंड ($१८.६५ अब्ज) ची इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या विस्तारासाठी गुंतवण्याची योजना आखत असल्याचे सांगितल्यानंतर टाटा मोटर्सचा शेअर वधारला. हा शेअर आज ४ टक्क्यांनी अधिक वाढला. हा शेअर १२ मे २०२२ रोजी ३६६ रुपयांपर्यंत घसरला होता. तो आता निचांकावरून २९ टक्क्यांनी वाढला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर ४७५ रुपयांपर्यंत पोहोचला. कालच्या ४६८ रुपयांच्या तुलनेत आज हा शेअर १.२७ टक्के वाढला. यामुळे टाटा मोटर्सचे बाजार भांडवल १.५७ लाख कोटींवर पोहोचले. टाटा मोटर्सचा शेअर एका वर्षात ७.५० टक्के आणि २०२३ मध्ये २२ टक्क्यांनी वाढला आहे. (Stock Market Closing)

अमेरिकेतील बाजार सपाट, आशियात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रिय ॲव्हरेज ०.२ टक्के खाली येऊन ३३,८९७ वर बंद झाला. एस अँड पी यात काही बदल दिसून आला नाही. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक सपाट पातळीवर म्हणजेच १२,१५७ वंर राहिला. आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. जपानचा निक्केई ५०अंकांनी वाढून २८,६५७ वर बंद झाला. तसेच टॉपिक्स निर्देशांक, हाँगकाँगचा हँग सेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक घसरला होते.

 हे ही वाचा :

Back to top button