Share Market Opening Bell | सेन्सेक्स सपाट, जाणून घ्या मार्केटमधील सुरुवातीची स्थिती

Share Market Opening Bell | सेन्सेक्स सपाट, जाणून घ्या मार्केटमधील सुरुवातीची स्थिती

Share Market Opening Bell : कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्सच्या घसरणीमुळे गेल्या तीन सत्रांमध्ये शेअर बाजाराचे नुकसान झाले आहे. पण गुरुवारी शेअर बाजाराने काहीसी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५९,७६९ वर पोहोचला. तर निफ्टी १७,६०० वर होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सपाट झाले.

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट टॉप गेनर्स आहे. हा शेअर १ टक्के वाढला आहे. एशियन पेंट्स, आयटीसी, टाटा मोटर्स, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक हेदेखील ‍वधारले आहेत. तर टाटा स्टील, बजाज फायनान्स हे घसरले आहेत.

अमेरिकेतील बाजार सपाट, आशियात घसरण

अमेरिकेतील निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रिय ॲव्हरेज ०.२ टक्के खाली येऊन ३३,८९७ वर बंद झाला. एस अँड पी यात काही बदल दिसून आला नाही. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक सपाट पातळीवर म्हणजेच १२,१५७ वंर राहिला. आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक घसरला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news