कात्रज-कोंढवा रस्ता वर्षात महापालिका पूर्ण करणार | पुढारी

कात्रज-कोंढवा रस्ता वर्षात महापालिका पूर्ण करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चति कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून पुढील आठवड्यात अनुदान मिळेल. यानंतर तत्काळ भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम भूसंपादनामुळे गेले चार वर्षांपासून रखडले आहे. रखडलेले काम मार्गी लागण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 200 कोटी रुपये जाहीर केले आहेत. भूसंपादनासाठी 281 कोटी रुपये लागणार आहे. महापालिका 81 कोटींचा निधी भूसंपादनासाठी देणार आहे.

राज्य शासनाची रक्कम पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने रस्त्यामध्ये जाणार्‍या मिळकतधारकांची बैठक घेतली. टीडीआर आणि रोख मोबदला घेऊन जागेचे भूसंपादन करण्यास सर्वजण तयार आहेत. सर्व कामे वेळेत झाल्यास येत्या मार्च 2024 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास ढाकणे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने ग्रेड सेप्रेटरचे काम हाती घेतले आहे.

Back to top button