दुचाकींच्या बनावट स्पेअर पार्टची विक्री | पुढारी

दुचाकींच्या बनावट स्पेअर पार्टची विक्री

पुणे/वाघोली : पुढारी वृत्तसेवा :  होंडा कंपनीच्या दुचाकींमध्ये वापरण्यात येणार्‍या बनावट एअर फिल्टरची विक्री करीत असल्याने वाघोलीतील नाकोडा अ‍ॅटोमोबाईल्स व मातोश्री गॅरेज या स्पेअर पार्ट विक्री करणार्‍या दुकानावर लोणीकंद पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून, दोन्ही दुकानांच्या मालकांवर कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील दुकानांमध्ये होंडा कंपनीचे स्पेअर पार्टची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली.

त्यानंतर कंपनीच्या वतीने ऑपरेशन हेड रेवणनाथ केकान यांनी पुणे पोलिसांकडे संबंधित तक्रार केली. लोणीकंद पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने वाघोली गावातील मातोश्री गॅरेज येथे छापा टाकून होंडा दुचाकीत वापरण्यात येणारे 208 बनावट एअर फिल्टर जप्त केले. त्यानंतर पुणे-नगर महामार्गालगत असणारे नाकोडा अ‍ॅटोमोबाईल्स या स्पेअर पार्ट विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकण्यात आला. याठिकाणीदेखील होंडा दुचाकीत वापरण्यात येणारे 114 बनावट एअर फिल्टर जप्त करण्यात आले. याप्रकरणी मातोश्री गॅरेजचे राम पोपट तांबे व नाकोडा अ‍ॅटोमोबाईल्सचे अल्पेश प्रकाचंदजी शहा यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात कॉपीराईट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात

Back to top button