नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; संघटनेचा संप मागे | पुढारी

नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; संघटनेचा संप मागे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी आता ४ हजार ८०० रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर ३ एप्रिलपासून सुरु असलेला नायब तहसीलदार, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या संघटनेने आज संप मागे घेतला.

संपावर तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली होती. मात्र बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने संघटनेने आपला संप सुरू ठेवला होता. अखेर आज मंत्री विखे- पाटील यांनी संघटनेशी चर्चा केली. नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी ४८०० रुपये करण्याची संघटनेची मागणी रास्त असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून वित्त विभागाची मंजुरी घेतली आहे. यामुळे चार दिवसांपासून सुरु असलेला संप मिटला आहे.

हेही वाचा : 

Back to top button