

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल अर्जाची छाननी आज बुधवारी सहायक निबंध कार्यालयात पार पडली. दाखल 160 अर्ज छाननीत वैध ठरवले असून, 3 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 संचालकांच्या जागेसाठी 160 जणांनी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. बुधवारी या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत हे सर्व अर्ज वैध झाल्याने आता निवडणुकीची पुढची रणनीती ठरणार असून, 20 एप्रिल रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे.
त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, निवडणुकीसाठी संचालकपदासाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात ते निश्चित होणार आहेत. दाखल केलेल्या 160 अजार्ंपैकी ज्या इच्छुक उमेदवाराने एका जाbajar saगेसाठी दोन अर्ज भरले. अशा उमेदवाराचा एकच अर्ज वैध ठरवला जाणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान 18 संचालकांपैकी आठ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाने सर्वाधिक 99 अर्ज दाखल केले, तर त्या खालोखाल महाविकास आघाडी प्रणित जगदंबा महाविकास आघाडी शेतकरी विकास मंडळाने 51 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी अशी लढत निवडणुकीत होती की काय हे 20 एप्रिलनंतर अर्ज माघारीनंतर निश्चित होणार आहे. निवडणूक अधिकारी सुनील खर्डे, सहायक निवडणूक अधिकारी योगेश नरसिंगपूरकर काम पाहिले.