हनुमानजी राक्षसांविरोधात लढले, आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढूया : पंतप्रधान मोदी | पुढारी

हनुमानजी राक्षसांविरोधात लढले, आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात लढूया : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – जेव्‍हा हनुमानजींना राक्षसांचा मुकाबला करावा लागला होता, तेव्‍हा ते तितकेच कठोर झाले होते. अशाच प्रकारे जेव्हा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजप तितकीच संकल्पबध्द होते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. ६ ) केले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ( BJP foundation day )

भाजपला हनुमानाकडून प्रेरणा मिळते

यावेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले की, हनुमानजी यांचे जीवन आजदेखील देशाच्या विकास यात्रेत प्रेरणा देते. लक्ष्मणावर जेव्हा संकट आले तेव्हा हनुमानजींनी अख्खा पर्वत उचलून आणला होता. यातून प्रेरणा घेत भाजप सर्वसामान्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नत आहे. हनुमानजींप्रमाणे भारत जगाला आपल्या शक्तीची जाणीव करुन देत आहे. भ्रष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत

BJP foundation day : दिल्‍लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्थापना दिनानिमित्त दिल्लीत भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सकाळी पक्ष मुख्यालयात झेंडावंदन केले. यावेळी तरुण चुघ, सुनील बन्सल यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते हजर होते. दिल्ली भाजपकडून एका आठवड्यासाठी सामाजिक न्याय कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button