‘दै. पुढारी’ने सैनिकांसाठी काश्मिर सीमेवर उभारलेले हॉस्पिटल देशाचा अभिमान : डॉ. शिवाजीराव बाबर | पुढारी

'दै. पुढारी'ने सैनिकांसाठी काश्मिर सीमेवर उभारलेले हॉस्पिटल देशाचा अभिमान : डॉ. शिवाजीराव बाबर

माद्याळ : पुढारी वृत्तसेवा : ‘दैनिक पुढारी’ने काश्मीर सिमेवर उभारलेले हॉस्पिटल भारतीय सैनिकांसाठी वरदान ठरले आहे, असे प्रतिपादन कर्नल डॉ. शिवाजीराव बाबर यांनी केले. कासारी ता.कागल येथे निवृत्त जवान विजय नाईक यांचा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सदिच्छा सोहळ्यात ते बोलत होते.

विजय नाईक हे २० वर्षांच्या देशसेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी भारतीय सैन्यदलात मॅकेनिकल सिग्नल विभागात सेवा बजावली. ग्रामस्थ व स्थानिक आजी-माजी जवानांच्या वतीने भव्य सदिच्छा सोहळा आयोजित करण्यात आला होता. नाईक यांचा सपत्नीक सत्कार कर्नल बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाबर म्हणाले की, देशसेवेसाठी तरूणांनी पुढे येण्याची गरज आहे. शासनाने संरक्षण दलात आमुलाग्र बदल केले आहेत. देशाच्या सिमा रक्षणासाठी तरुणांनी पुढे यावे. देश जडणघडणीत शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तो देशाचा अन्नदाता आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्दल सागर इंगवले व विजय पाटील यांचा सत्कार सरपंच मन्सूर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. माजी जवान शशिकांत कुरणे, गोविंद कांबळे, अर्जुन माने, कृष्णात नाईक, सुरज काटे, परसु कांबळे यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. शिवाजी इंगवले, वर्षा नाईक, मनिषा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच तानाजी पाटील, शिवाजी इंगवले, राजेंद्र राजिगरे, सागर पाटील, इम्रान देसाई, आर.जी.पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी इंगवले व आभार सचिन सुतार यांनी मानले.

हेही वाचा : 

Back to top button