Pan-Aadhaar Link : ३१ मार्च पूर्वी आधार क्रमांक पॅनशी लिंक करा अन्यथा… | पुढारी

Pan-Aadhaar Link : ३१ मार्च पूर्वी आधार क्रमांक पॅनशी लिंक करा अन्यथा...

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च पर्यंत देण्यात आली आहे. ३१ मार्च पूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा बँक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

कायम खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड हा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आयडी आहे. या शिवाय कोणतेही आर्थिक काम सांभाळणे कठीण आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते गुंतवणूक करण्यापर्यंत सर्व कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुमची अनेक कामे पॅनकार्डशिवाय थांबू शकतात. जर तुम्ही अद्याप पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर तुम्हाला मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

लिंकिंगची अंतिम मुदत वाढवली जाईल का?

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत यापूर्वी अनेकदा वाढवली आहे. तुम्ही ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास, १ एप्रिल २०२३ पासून तुमचा पॅन निष्क्रिय केला जाईल. आता पॅन आणि आधार लिंकिंगची मुदत वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.

पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक?

पॅन आणि आधार केवायसीचा महत्त्वाचा भाग आहे. सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. कारण यामुळे बनावट पॅन कार्डचा वापर टाळता येईल. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत अशी प्रकरणे थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा : 

Back to top button