Vacant posts in three forces | महत्वाची बातमी! तीन सशस्त्र दलांत १.५५ लाख पदे रिक्त, आर्मीत सर्वांधिक, जाणून घ्या अधिक | पुढारी

Vacant posts in three forces | महत्वाची बातमी! तीन सशस्त्र दलांत १.५५ लाख पदे रिक्त, आर्मीत सर्वांधिक, जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील तीन सशस्त्र दलांमध्ये (Vacant posts in three forces) सुमारे १.५५ लाख कर्मचार्‍यांची कमतरता आहे. लष्करात (Army) सर्वांधिक १.३६ लाख पदे रिक्त आहेत, अशी माहिती सोमवारी राज्यसभेत संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी एका लेखी उत्तरातून दिली. ते म्हणाले की, सशस्त्र दलात कर्मचार्‍यांची कमतरता आणि त्यावरील उपायांचा नियमितपणे आढावा घेतला जातो आणि रिक्त पदे भरण्यासाठी आणि तरुणांना सशस्त्र दलातील सेवेत सामील होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

भट्ट म्हणाले की, भारतीय लष्करात (Indian Army) ८,१२९ अधिकाऱ्यांची कमतरता आहे ज्यात आर्मी मेडिकल कॉर्प्स आणि आर्मी डेंटल कॉर्प्सचा समावेश आहे. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (MNS) मध्ये ५०९ पदे रिक्त आहेत आणि JCOs आणि इतर रँक्समध्ये १,२७,६७३ पदे रिक्त आहेत. ग्रुप ए मध्ये २५२ पदे रिक्त आहेत. ग्रुप बी मध्ये २,५४९ आणि ग्रुप सी मध्ये ३५,३६८ पदे रिक्त आहेत.

नौदलात १२ हजार ४२८ जवानांची कमतरता आहे. त्यात १,६५३ अधिकारी, २९ वैद्यकीय आणि दंतचिकित्सा अधिकारी आणि १०,७४६ सेलर्सचा समावेश असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे.

नागरी कर्मचार्‍यांमध्ये ग्रुप ए मध्ये १६५, ग्रुप बी मध्ये ४,२०७ आणि ग्रुप सी मध्ये ६,१५६ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. भारतीय हवाई दलात ७,०३१ जवानांची कमतरता आहे. त्यात ७२१ अधिकारी, १६ वैद्यकीय अधिकारी, ४,७३४ एअरमन आणि ११३ मेडिकल असिस्टंट ट्रेडच्या एअरमनचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“तपशीलवार विश्लेषणावर आधारावर सशस्त्र दलातील कर्मचार्‍यांची कमतरता आणि त्यावरील उपायांचा सशस्त्र दलांकडून नियमितपणे आढावा घेतला जातो. रिक्त पदे भरण्यासाठी आणि तरुणांना सेवेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत,” असे भट्ट यांनी पुढे नमूद केले आहे. (Vacant posts in three forces)

हे ही वाचा : 

Back to top button