“राहुल गांधींनी माफी मागावी”; रणजीत सावरकर यांची मागणी; म्हणाले, शरद पवार योग्य बोलतात पण.. | पुढारी

"राहुल गांधींनी माफी मागावी"; रणजीत सावरकर यांची मागणी; म्हणाले, शरद पवार योग्य बोलतात पण..

पुढारी ऑनलाईन डेस्क : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सावरकरांबद्दल खूप आदर आहे, ते म्हणतात ते योग्य आहे. पण त्यांनी राहुल गांधींना सावरकरांबद्दल आतापर्यंत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगावी,” असे वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंची आताची भूमिका योग्य पण मुख्यमंत्री असताना शिदोरी या मुखपत्रावर कारवाई का केली नाही. आता पक्षीय राजकारणासाठी सावरकरांचा वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

राजकारणासाठी राहुल गांधींकडून सावरकरांचे नाव बदनाम केले जात आहे, हे पाहून खरोखरच वाईट वाटते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावावर राजकारण केले जात आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल आदर असेल, पण जोपर्यंत ते सावरकरांना पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत त्यात काही अर्थ नाही. अल्टिमेटम देऊनही काँग्रेस थांबली नाही आणि त्यांनी (उद्धव ठाकरे गट) अद्याप काँग्रेसपासून फारकत घेतलेली नाही. सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका, अशी विनंती रणजित सावरकर यांनी केली आहे.

शरद पवार यांनी १९८९ ला सावरकर स्मारकात चांगले भाषण केले होते. ते म्हणतात ते योग्य आहे पण त्यांचे साथीदार ऐकत नसतील तर शरद पवार व उद्धव ठाकरेंनी अपमान करू नका असे म्हणणे, काँग्रेसने अपमान करत राहणे आणि या तिघांनी आघाडी कायम ठेवणे हे चुकीचं आहे. काँग्रेस यापुढे बगल देईल पण सावरकांवरांचा जो अपमान झाला आहे, त्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. राहुल गांधी गप्प बसले म्हणुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा शरद पवार यांनी माफ करणे हे उत्तर नाही. यांना खरोखरच आदर असेल तर राहुल गांधी यांच्याकडून माफी मागून घ्यावी, असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button