पाकिस्तानमध्ये फोन चॅटिंग, नागपुरात एनआयएचे छापासत्र | पुढारी

पाकिस्तानमध्ये फोन चॅटिंग, नागपुरात एनआयएचे छापासत्र

नागपूर,पुढारी वृत्‍तसेवा : पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी संशयास्पद व्हॉट्सॲप चॅटिंग करताना आढळल्यावरून नागपुरातील सतरंजीपुरा, हंसापुरी परिसरात एनआयएने धाड टाकली. नागपूर हे संवेदनशील शहर असल्याने याकडे गांभीर्याने बघितले जात आहे.
गुरुवारी (दि.23) पहाटे चारच्या सुमारास स्थानिक लकडगंज पोलिसांच्या सहकार्याने ही धाड टाकण्यात आली. ही धाड सकाळपासून बराच वेळ सुरू होती.

मात्र, याविषयीचा अधिक तपशील देण्यास एनआयए अथवा स्थानिक पोलिसांनी नकार दिला. 2017 सालचे हे प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. यावेळी कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे विशिष्ट शिक्षणासंबंधी चौकशी करण्यासाठी त्या युवकाने हे फोन कॉल व्हॉट्सॲप चॅटिंग केले होते. त्यावेळी तो 17 वर्षाचा होता अशी माहिती पुढे आली.

गुरूवारी या संदर्भात पोलिसांनी संबंधित दोघांची चौकशी केली असून अद्याप कोणालाही अटक केली नाही. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन आयआरएफशी या संदर्भात रायबरेलीत काही लोकांशी संपर्क करण्यात आला होता. याच संदर्भात चौकशीसाठी ही टीम नागपुरात आली. नोटीस बजावल्यानंतर संबंधितांकडून मोबाईल ताब्‍यात घेण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

नाशिक : एप्रिलअखेरीस मिलेट महोत्सव, सरस प्रदर्शन

नाशिक : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील संशयितांची धिंड

नेवासा तालुक्यातील शिवरस्त्याचा श्वास कोंडलेलाच; नोटिसा बजावूनही अतिक्रमणे हटेनात

Back to top button