Voter ID- Aadhaar card link | मतदार ओळखपत्र, आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या अधिक | पुढारी

Voter ID- Aadhaar card link | मतदार ओळखपत्र, आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवली आहे. ही मुदत १ एप्रिल २०२३ अशी होती. दरम्यान, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य नाही. कायदा आणि न्याय मंत्रालयाने राजपत्र अधिसूचनेत म्हटले आहे की मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठीचे अर्ज नाकारले जाणार नाहीत. जर मतदार आधार क्रमांक देऊ शकला नाही तर मतदार यादीतून नोंदी हटवल्या जाणार नाहीत, असेही त्यात नमूद केले आहे. (Voter ID- Aadhaar card link)

यूजर्स ३१ मार्च २०२४ पर्यंत त्यांचे आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे लिंक करू शकतात. डिसेंबर २०२१ मध्ये लोकसभेत निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर मतदार ओळखपत्रांसह आधार लिंकिंग अधिकृत करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या लिंकिंगमुळे एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त मतदारसंघात नोंदणी ओळखण्यास मदत होते. (Voter ID- Aadhaar card link)

दरम्यान, पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक न केल्यास ३१ मार्चनंत पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना मार्च २०२३ अखेरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केलेले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button