तुमचे आधार कार्ड बोगस आहे का? घरबसल्या कशी माहिती घ्याल… | पुढारी

तुमचे आधार कार्ड बोगस आहे का? घरबसल्या कशी माहिती घ्याल...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डला खूप महत्त्‍व आहे. बँक खाते असुदे किंवा नवीन मोबाईफ फोन
सिम कार्डसाठी आधार कार्ड असणे आवश्‍यक असते. तुमच्‍याकडे आधार कार्ड नसेल तर अनेक कामे रखडली जाऊ शकतात. मात्र सध्या बोगस आधार कार्ड बनवल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. तुम्हाला जर कधी कोण म्हणाले की, तुमचे आधार कार्ड बोगस आहे. घाबरू नका, असे बनावट कार्ड कसे ओळखायचे याची माहिती जाणून घेवूया.(Verify Aadhaarr)

आधार कार्डचे व्हेरिफिकेशन प्रोसेस करणे अत्यावश्यक

अलिकडेच अशा घटना समोर आल्या आहेत की, ज्यामध्ये आधार नंबरऐवजी एखादा बनावट १२ डिजिट नंबर वापर केला जात आहे. काही घटना अशा देखील आहेत की, कार्ड, नंबर आणि फोटो तीनही वेगवेगळी माहिती वापरुन गैरवापर केला जातो. त्यामुळे आता आपल्या आधार कार्डचे व्हेरिफिकेशन (Verify Aadhaar) प्रोसेस करणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांतून आधार कार्डची सत्यता (Aadhaar Card Authentcity) पडताळी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे घरबसल्या युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच युआयडीएआय (UIDAI) या वेबसाईटच्या माध्यमातून ही पडताळणी करता येते. मात्र कित्येक लोकांना याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे बऱ्याचजणांचे आधार कार्डची सत्यता (How to verify Aadhaar Card) तपासली जावॅ शकते. तुम्हाला घरबसल्या आधार कार्डची पडताळणी करता येणार आहे.

असे तपासा आपलं आधार कार्ड…

  • सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईट uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. पुढे Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Verify An Aadhaar Number असा पर्याय उपलब्ध होईल. यावर क्लिक करा.
  • या पेजवर आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
  • या माहितीची पूर्तता केल्यानंतर Proceed Verify या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन वेब पेज सुरु होईल. यामध्ये अचूक आधार नंबर दिसेल. त्यानंतर EXISTS असा पर्याय दिसेल. यावरुन तुमचे आधार नंबर किंवा आधार कार्डची सत्यता पडताळणी पूर्ण होईल.
  • शेवटी तुम्हाला Aadhaar Verification Completed म्हणजेच आधार पडताळणी पूर्ण झाली असा संदेश मिळेल.
  • यावेळी जर तुम्हाला Error असा संदेश दाखवत असेल तर तुमचा आधार नंबर चुकीचा आहे अशी माहिती मिळेल.

हेही वाचा

Back to top button