पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय | पुढारी

पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक न केल्यास 31 मार्चनंत पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना मार्च 2023 अखेरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केलेले आहे. ज्यांनी कुणी अद्याप पॅन आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही. कारण, ऑनलाईन, एसएमएसद्वारे घरबसल्या पॅन आधारशी लिंक करणे सोपे आहे. तेव्हा आजच लिंक करून मोकळे व्हा. सवलतीच्या श्रेणीत न मोडणार्‍या सर्व पॅनधारकांसाठी आधार लिंक करणे आयटी अधिनियमानुसारही आवश्यक आहे.

एसएमएसच्या माध्यमातून लिंक करण्यासाठी हे करा…

  • स्टेप 1 : टेक्स्ट मेसेज अ‍ॅपवर जा
  •  स्टेप 2: णखऊझअछ फॉर्मेटमध्ये मेसेज टाईप करा
  •  स्टेप 3 : मेसेजमध्ये तुम्हाला फक्त UIDPAN (स्पेस) 12 डिजिट आधार नंबर (स्पेस) आणि 10 डिजिट पॅन नंबर टाकायचा आहे.
  •  स्टेप 4 : आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 567678 या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे.
  •  स्टेप 5 : मेसेज सेंड होताच तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचे कन्फर्मेशन प्राप्त होईल.

Back to top button