PM Narendra Modi : काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव | पुढारी

PM Narendra Modi : काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हा आरोप करत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात या प्रस्तावावरून पुन्हा एकदा सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आले आहेत. (PM Narendra Modi)

राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून काँग्रेसचा आरोप

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेसने राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान काँग्रेस नेत्यांवर केलेल्या वक्तव्याच्या आधारे काँग्रेसकडून विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काँग्रेसला पाठवलेल्या या नोटीसमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल अवमानकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही काँग्रेसचे नेते लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत.

PM Narendra Modi : काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे. पत्रानुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “मला खूप आश्चर्य वाटत आहे की नेहरूजींचे नाव आमच्याकडून विसरले असावे, आणि जर ते विसरले असेल तर आम्ही ते दुरुस्त करू. कारण ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण मला समजत नाही की त्यांच्या पिढीतील कोणीही नेहरूजींचे आडनाव ठेवण्यास का घाबरतो आहे? नेहरू हे आडनाव ठेवण्यात लज्जा वाटते क? अशी महान व्यक्ती तुम्हाला मान्य नाहीत, कुटुंबालाही मान्य नाही.

हेही वाचा

Back to top button