बीड : वाडी,वस्तीवरची पोरं नासाला भेट देणार, चाचणी परिक्षेचा निकाल जाहीर | पुढारी

बीड : वाडी,वस्तीवरची पोरं नासाला भेट देणार, चाचणी परिक्षेचा निकाल जाहीर

बीड, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो व नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता जिल्हास्तरावर झालेल्या परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.१३) सायंकाळी जाहीर करण्यात आला. यामध्ये ३३ विद्यार्थ्यांनी यश मिळवला असून यातील बहुतांश मुले वाडी, वस्तीवरील शाळांमधील आहेत. ही मुले आता नासा व इस्त्रोला भेट देणार आहेत.
जिल्हापरिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांना इस्त्रो व नासाला भेट देता यावी, तेथे चालणार्‍या संशोधन कार्याबद्दल माहिती मिळावी याकरिता सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या सहलीकरिता विद्यार्थी निवडीसाठी तालुका स्तरानंतर जिल्हा स्तरावर चाचणी परिक्षा घेण्यात आली. यामध्ये ११० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील ३३विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून ही सर्व मुले ग्रामीण, दुर्गम भागातील वाडी-वस्तीवर असलेल्या जिल्हापरिषद शाळांमधील आहेत. सोमवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये 14 मुली व 19 मुलांचा समावेश असून पाचवीमधील 7, सातवीमधील ९ व इयत्ता ८ वीतील १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या सहलीचे लवकरच नियोजन करण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांनी मिळवले यश

वैभव पिसाळ, श्रीकृष्ण चाटे, नंदिनी केंद्रे, जयवर्धन झांजे, प्रणव झांजे, श्रेया कस्तुरे, शिवप्रसाद कोकाटे, अभय वाघमारे, सृष्टी पवार, अंशुमन दुबे, समीर शेख, प्रतिक्षा सोनटक्के, प्रतिक गव्हाणे, विवेक पाचर्णे, सानिका देवकर, अजय शेळके, निलेश चाटे, सृष्टी भोसले, विशाल गायके, निकीता वाशिंबे, ऋतुजा धनवडे, भाविका फ ड, कपील कुंभार, श्रावणी दहिफ ळे, पृथ्वीराज पवार, अक्षरा पवार, समृद्धी हुंबे, युवराज सानप, अथर्व देवकर, आराध्या नागरगोजे, पार्थ मुंडे, सुदर्शन मुंडे, प्रगती करपे या विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश मिळवले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button