गोवा : राहुल गांधी यांचा दहशतवादाशी संबंध : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव | पुढारी

गोवा : राहुल गांधी यांचा दहशतवादाशी संबंध : विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

पणजी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा गांधी तसेच राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी, त्यांचे वडील राजीव गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे वेगळ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचे आणि राहुल गांधी यांचे दहशतवादाशी संबंध आहेत, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या ट्विटला युरी यांनी प्रत्युत्तर दिले. युरी म्हणाले, ज्यांना दहशतवादाचे संकट झेलावे लागले तेच त्याची वेदना समजू शकतात. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की, ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या दिवशी श्रीनगर-काश्मीरमध्ये राष्ट्रीय नेते राहुल यांचे भाषण त्यांनी पाहावे. हाथ से हाथ जोडो मोहिमेने भाजपला पुन्हा एकदा धडकी भरली आहे.

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या सहा ट्विट पोस्ट दिशाभूल करणार्‍या आहेत. राहुल यांनी यात्रेदरम्यान पुलवामा शहिदांना श्रद्धांजली वाहिली आणि भारतीय हद्दीत चीनच्या आक्रमणाविरोधात सरकारकडे कारवाई करण्याची मागणी केली, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी दहशतवाद संपुष्टात आणण्याबाबत स्पष्टपणे भाष्य केले होते.

Back to top button