पुणे : तब्बल 31 वर्षांनी काँग्रेसला पुन्हा विजय | पुढारी

पुणे : तब्बल 31 वर्षांनी काँग्रेसला पुन्हा विजय

पुणे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यानंतरच्या सतरा निवडणुकांमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातील सातव्या वेळी काँग्रेसने विजय खेचून आणला. मात्र, गेल्या सलग सहावेळा भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्यानंतर पुन्हा तब्बल 31 वर्षांनी काँग्रेसला या मतदारसंघात पुन्हा संधी मिळाली आहे. या मतदारसंघाचे नाव 1952 ते 1971 पर्यंत शुक्रवार मतदारसंघ असे होते, तर 1972 पासून कसबा असे नामकरण करण्यात आले.

उमेदवार आणि त्यांचे पक्ष

1952 वि. कृ. उर्फ बू साठे : काँग्रेस
1957 विष्णुपंत चितळे : सीपीआय कम्युनिस्ट पक्ष
1962 बाबुराव सणस : काँग्रेस
1967 रामभाऊ तेलंग : काँग्रेस
1972 लीलाताई : काँग्रेस
1978 अरविंद लेले : जनसंघ
1979 अरविंद लेले : जनसंघ
1985 उल्हास काळोखे : काँग्रेस
1990 अण्णा जोशी : भारतीय जनता पक्ष
1991 वसंत थोरात : काँग्रेस
1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 गिरीश बापट : भारतीय जनता पक्ष
2019 मुक्ता टिळक : भारतीय जनता पक्ष
2023 रवींद्र धंगेकर : काँग्रेस

 

Back to top button