sharad pawar meets gadkari : गडकरी -पवार भेटीने राजकीय चर्चेला उधाण | पुढारी

sharad pawar meets gadkari : गडकरी -पवार भेटीने राजकीय चर्चेला उधाण

पुणे ; पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवारी केंद्रीय भुपृष्ठ व जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी पुण्यातील लोहगाव विमानतळावर भेटीला गेले.या भेटीने राज्याच्‍या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (sharad pawar meets gadkari)

केंद्रीय मंत्री गडकरी यांचा आठवडाभरात सलग दुसर्‍यांदा पुणे दौरा शनिवारी होता. निमित्त होते, नगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पाच्या भूमिपुजन समारंभाचे, कारण काहीही असले तरी पवार आणि गडकरी यांची विशेष भेट (sharad pawar meets gadkari) हा काही साधारण योग नसल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात शनिवारी रंगली होती.

निळा नेहरू शर्ट व पांढरा पायजमा अशा साध्या वेशात गडकरींचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती.

विमानतळावरील व्हीआयपी कक्षात गडकरी, पवार भेट झाली.

तेथे दोघांनी सोबत नाश्ता केला. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. त्यांच्यातील चर्चेचा तपशील मात्र, बाहेर आला नाही. त्यानंतर बाहेरच्या लॉबीत येऊन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील नेते मंडळींनी विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतचे निवेदन गडकरी यांना दिले. त्यानंतर गडकरी व शरद पवार यांनी नगर येथे कार्यक्रमाला एकत्रित उपस्थिती लावली.

हे ही वाचा…

Back to top button