air india disinvestment : एअर इंडियाची घरवापसी की नवा मालक मिळणार? - पुढारी

air india disinvestment : एअर इंडियाची घरवापसी की नवा मालक मिळणार?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

air india disinvestment : सार्वजनिक क्षेत्रातील हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या विक्रीचा सौदा अंतिम टप्प्यात आला असून चालू आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून कंपनीच्या नव्या मालकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी येथे दिली.

टाटा सन्स आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांनी एअर इंडियासाठी air india disinvestment निविदा भरल्या होत्या. यात वित्तीय निविदेमध्ये टाटा सन्स आघाडीवर असल्याने या कंपनीकडे एअर इंडियाची मालकी जाणे अटळ आहे.

गेल्या काही वर्षात एअर इंडियाचा संचित तोटा प्रचंड प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीची विक्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यादृष्टीने सरकारने गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापनाही केली होती.

67 वर्षांपूर्वी एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे होती, पण तत्कालीन सरकारने या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले होते. एअर इंडिया जर पुन्हा टाटा सन्सच्या ताब्यात आली तर ती मूळ मालकाकडेच परत येणार आहे.

एअर इंडियाची मालकी कुणाकडे द्यायची, air india disinvestment याचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात सरकार घेणार आहे. 1932 साली टाटा समूहाने टाटा एअरलाईन्स या नावाने हवाई वाहतूक कंपनी चालू केली होती. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1953 मध्ये सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा मंजूर करून टाटा समूहाचे बहुतांश समभाग खरेदी केले होते.

सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी जी किंमत निश्चित केली आहे, त्यापेक्षा 3 हजार कोटी रुपयांची जास्त बोली टाटा सन्सने लावलेली आहे. स्पाईसजेटचे मालक अजय सिंग यांनी लावलेल्या बोलीपेक्षा टाटा सन्सची बोली पाच हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button