Dr amol kolhe on Ajit pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे.
अजितदादांना मुख्यमंत्रिपदी बसलेलं बघायचे आहे, हीच भावना ठेऊन त्यांच्या पाठीशी ताकद उभी करा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr amol kolhe)यांनी केले. शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला पालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लावू नका असे आवाहनही त्यांनी केले. ते आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे ,माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम ,नगरसेवक अजित गव्हाणे,अनुराधा गोफणे, संगीता ताम्हाणे, संजय वाबळे, विक्रांत लांडे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे,शहर प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार कोल्हे (Dr amol kolhe) म्हणाले की, शरद पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळतय ही भाग्याची गोष्ट आहे. पण देशाच्या पंतप्रधानपदी शरद पवारांना पाहायचे असेल तर त्या सर्वोच्च नेत्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये. हीच गोष्ट राज्यपातळीवर अजित पवारांच्या बाबतीत आहे.
पिंपरी-चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित पवार यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.