उदयनराजे भोसले : ‘माझ्या विचारांना चालना देण्यासाठी अजित पवारांचे जास्त दौरे’ | पुढारी

उदयनराजे भोसले : 'माझ्या विचारांना चालना देण्यासाठी अजित पवारांचे जास्त दौरे'

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे सुरू आहेत. याबाबत खा. उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्या वाढत्या दौऱ्यांवर खोचक टीका केली आहे.

यावेळी बोलत असताना खा. उदयनराजे म्हणाले की, उपमुख्यमंत्री यांना सांगितलं आहे. जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करा म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचे काम मंत्री या नात्याने करणं तुमचं कर्तव्य आहे. सूचना आम्ही वेळोवेळी देत जाऊ त्या आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारख्या तज्ज्ञ लोकांनी केलं पाहिजे आणि ते करतील.

हे ही वाचलं का?

Back to top button