निमगाव केतकीतून 10 शेळ्या चोरीला | पुढारी

निमगाव केतकीतून 10 शेळ्या चोरीला

इंदापूर : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील खडकमळा परिसरातून तीन शेतकर्‍यांच्या 10 शेळ्या चोरीला गेल्या. हा प्रकार रविवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी राजकुमार दत्तु आदलिंग (रा. खडकमळा, निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दत्तु आदलिंग यांच्या गोठ्यातून चोरट्यांनी शनिवारी (दि. 18) रात्री दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेले. रविवारी सकाळी ते गोठ्यात गेले असता त्यांना चोरीचा हा प्रकार समजला. त्यांनी वस्तीवर शोध घेतला असता शेळ्या व बोकड मिळून आले नाही. तर वस्तीवरील अमोल बळी शेंडे यांच्या 2 शेळ्या व सचिन आप्पासाहेब आदलिंग यांच्या 5 शेळ्याही चोरीला गेल्याचे समजले.

Back to top button