हिंगोली : एसटी कंडक्टरचा प्रामाणिकपणा, प्रवासात विसरलेले १७ हजार, सोने केले परत | पुढारी

हिंगोली : एसटी कंडक्टरचा प्रामाणिकपणा, प्रवासात विसरलेले १७ हजार, सोने केले परत

शिरडशाहापूर (हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा – १३ फेब्रुवारी रोजी सोमवारी चोंडी ते शिरडशाहापूर प्रवासात दरम्यान विसरलेली बॅग अंदाजे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग बसच्या कंडक्टरने परत केल्याची घटना घडली आहे.
वसमत औंढा रोडवर एसटी महामंडळाची वसमत आगाराची बसेस रोज धावतात. अनेक प्रवासी एसटीने प्रवास करतात. एक प्रवासी शेख जुबेर शेख उमर हे आपल्या सासरवाडीला जात होते. चोंडी आंबा येथून महामंडळमध्ये बसून शिरडशहापूरला उतरले आणि बॅग एसटीमध्येच विसरले. त्यात दीड लाख रुपये किंमतीची दागिने आणि १७ हजार रुपये रोख रक्कम बॅगमध्ये होती. (हिंगोली)

मात्र, ही बॅग एसटी कंडक्टर (वाहक) विठ्ठल गजेंद्र पुरीच्या लक्षात आल्यानंतर बॅग त्यांनी सांभाळून दुसऱ्या राउंडला प्रवाशाच्या स्वाधीन केली. यावेळी एसटी ड्रायव्हर विलास कदम, सय्यद जाफरसह आदी उपस्थित होते. यामुळे एसटी महामंडळाच्या कंडक्टर( वाहक) विठ्ठल गजेंद्र पुरी यांच्या या इमानदारीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button