Akshaya- Hardeek : राणादा- पाठकबाईचा पहिला व्हॅलेंटाईन (Photo)

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगाला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईची (अंजली) जोडी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. मालिकेत दिसलेले हे क्यूट कपल खऱ्या आयुष्यातही एकत्रित आले. राणादा म्हणजे, मराठी अभिनेता हार्दिक जोशी आणि सर्वाची लाडकी पाठकबाई म्हणजे, अभिनेत्री अक्षया देवधर दोघे गेल्या वर्षी एकमेकांचे जीवनसाथी बनले. लग्नानंतर हार्दिक-अक्षयाचा ( Akshaya- Hardeek ) पहिला ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत.
हार्दिकने अक्षयाला ( Akshaya- Hardeek ) ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यात फोटोत खास करून हार्दिकने अक्षयाला गुलाबाचे फूल देऊन प्रपोज केलं आहे. यानंतर अक्षयानेदेखील ते फुल स्वीकारत हार्दिकला ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. हा त्याचा खास फोटो दोघांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या फोटोला ‘मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना, बस ये समझ लो, लफ्ज कम मोहब्बत ज्यादा है!♥️’. अशी कॅप्शन लिहिली आहे. परतु, हा शॅडो फोटो असून हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. यात रेड- ब्राऊन कलरच्या साडीसोबत अक्षयाने केसांत फुलांचा गजरा माळला आहे. तर हार्दिक शर्टमध्ये हॅडसम दिसतोय. यासोबत हार्दिकने हार्ट एक ईमोजीदेखील शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा :
- Amruta Khanvilkar : चंद्रा इतकी कशी बदलली❤️🔥; अमृताला खुर्ची सम्राट बनायचंय?
- Shalva Kinjawdekar : येऊ कशी तशी मी नांदायला फेम शाल्वचा साखरपुडा
- Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली तुर्कीतील मन हेलावणारी दृश्ये (Video)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram