जालना: आदित्य ठाकरेंच्या स्वागतादरम्यान मोबाईलसह ११ हजारांची रोकड लंपास | पुढारी

जालना: आदित्य ठाकरेंच्या स्वागतादरम्यान मोबाईलसह ११ हजारांची रोकड लंपास

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : शिवसंवाद यात्रे दरम्यान गेवराई येथील रुई येथे जात असताना अंबड तालुक्यातील वडीगोद्री टी पॉईट येथे अंबड युवासेनेच्या वतीने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार शिवाजी चोथे, हनुमान धांडे, श्रीमंत खटके, पंडित गावडे, संभाजी गावडे, युवा सेनेचे विनायक चोथे, राम लांडे, अॅड. गणेश शिंदे, अभिजीत खटके, प्रसाद पिंगळे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, सत्कार कार्यक्रमा दरम्यान आदित्य ठाकरे येताच एकच गर्दी उसळली. या गर्दीचा फायदा घेत व्हाईट कॉलर मधील चोरट्यांनी एकाचा मोबाईल, तर एकाच्या खिशातील १० हजार रुपये, तर आणखी एकाचे १ हजार रूपयांचे पाकीट मारले. असे मिळून रोख ११ हजार व ३२ हजारांचा मोबाईल असा एकूण ४३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. याआधी आदित्य ठाकरे गोरी गंधारी येथे आले होते. त्यावेळी अनेकांचे पैसे व मोबाईल चोरीला गेले होते.

हेही वाचा 

Back to top button