परभणी: रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | पुढारी

परभणी: रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : पूर्णा ते नांदेड लोहमार्गावर रेल्वे अपघातामध्ये एक २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.८) घडली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना पूर्णा तालुक्यातील आडगाव- बडबडी शिवारातून जाणाऱ्या लोहमार्गावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील नावकी येथील गौतम जगन्नाथ राऊत (वय २८) हा तरुण पूर्णापासून जवळ असलेल्या आडगाव- बडबडी शिवारातून जात होता. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लोहमार्ग मैल क्रमांक ३२१/३ या ठिकाणी नांदेडकडून पूर्णेकडे येणाऱ्या रेल्वेची गौतम राऊतला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेल्वे स्टेशन मास्तर यांनी पूर्णा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरुणाची ओळख पटवली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button