परभणी : दुचाकींच्या अपघातात वडिलाचा मृत्यू ; मुलगा जखमी | पुढारी

परभणी : दुचाकींच्या अपघातात वडिलाचा मृत्यू ; मुलगा जखमी

पूर्णा: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पूर्णा- ताडकळस रस्त्यावर कानखेड शिवारात बॉम्बे पुलालगत आज (दि. ८) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील वडिलांचा मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला. हभप रावसाहेब मुंजाजी ढोणे (वय ६०, रा. पांगरा ढोणे) यांचा मृत्यू झाला. गंगाधर रावसाहेब ढोणे हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या दुचाकीस्वारही जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पांगरा ढोणे येथून हटकरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपल्या दुचाकीवरून (एमएच. २२ एटी ४६९८) गंगाधर रावसाहेब ढोणे व रावसाहेब मुंजाजी ढोणे जात होते. यावेळी समोरुन खुजडा येथून पुर्णेकडे भरघाव येणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात रावसाहेब ढोणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंगाधर ढोणे जखमी झाला.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मयत रावसाहेब ढोणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तर दुसऱ्या दुचाकीस्वार युवकास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
रावसाहेब ढोणे यांच्या अपघाती निधनामुळे पांगरा गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा ४ मुली, नातवंडे, असा परिवार आहे. वारकरी सांप्रदायातील एक मोठे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.

हेही वाचा 

Back to top button